सोलापूर, महाराष्ट्र
सोलापूरच्या जनतेमध्ये आपुलकीने 'बापू' म्हणून ओळखले जाणारे अमोल बाळासाहेब शिंदे हे केवळ राजकीय पद भूषवणारे नेते नसून, प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारे हक्काचे लोकप्रतिनिधी आहेत. सोलापूरच्या उत्तर कसबा व मंगळवेढा तालीम परिसराच्या सामाजिक व सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या बापूंचे संपूर्ण जीवन तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी समर्पित राहिले आहे.
वडिलांच्या, कै. बाळासाहेबांच्या (आप्पा) शिंदे यांच्या विचारांचा व मूल्यांचा वारसा पुढे चालवताना त्यांनी नेहमीच 'सुलभ व सहज उपलब्ध नेतृत्व' ही ओळख जपली आहे. पाण्याचा प्रश्न असो, रस्त्यांची कामे असोत, किंवा कष्टकरी कामगारांच्या हक्काचा लढा असो - बापू नेहमीच स्वतः आघाडीवर उभे राहून थेट लोकांमध्ये मिसळून काम करतात.
तरुण वयात कै. शिवाजीराव (महाराज) पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक कार्याची पहिली पावले उचलली. समाज प्रबोधन, सहकार आणि युवा संघटना याद्वारे त्यांनी सोलापूरच्या सामाजिक जडणघडणीत स्वतःचे वेगळे आणि आदराचे स्थान निर्माण केले.
प्रत्येक प्रभागात काँक्रीट रस्ते, स्वच्छ भूमिगत ड्रेनेज, शुद्ध पिण्याचे पाणी आणि २४ तास प्रकाशमान पथदिवे.
सोलापूरच्या विडी, यंत्रमाग व कापड उद्योगातील कामगारांचे रक्षण आणि नवीन पिढीसाठी स्थानिक रोजगार निर्मिती.
श्री सिद्धेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान आणि संवर्धन.
शिक्षण पूर्ण करून कै. शिवाजीराव (महाराज) पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली वडिलांच्या, कै. बाळासाहेबांच्या (आप्पा) शिंदे यांच्या नावे 'आप्पा ग्रुप'ची स्थापना करत सामाजिक कार्यास सुरुवात केली.
महाराष्ट्र राज्यातील पहिले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची स्थापना केली व आजतागायत हा भव्य जन्मोत्सव अविरतपणे सुरू आहे.
मराठा सेवा संघ संचलित संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड व शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर संभाजी ब्रिगेड शाखांची उद्घाटने करत संघटना बांधणीस सुरुवात.
काँग्रेस पक्षात प्रवेश व सोलापूर महानगरपालिकेत प्रभाग क्र. २० मधून ५५५ मताधिक्याने विजय (एकूण मते: ३०५५).
सोलापूर शहर उत्तर युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड होऊन युवकांच्या प्रश्नांवर सक्रिय कार्य व युवक संघटनेचे बळकटीकरण.
सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड होऊन संपूर्ण जिल्ह्यात युवकांचे संघटन आणि जनआंदोलनांचे नेतृत्व केले.
मराठा सेवा नागरी सह. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी एका मताने ऐतिहासिक निवड व आजतागायत अध्यक्षपद अविरतपणे कायम राखत पतसंस्थेचा पारदर्शक कारभार सांभाळला आहे.
शिवसेना पक्षात प्रवेश व सोलापूर महानगरपालिकेत प्रभाग क्र. ७ मधून १५१९ मताधिक्य मिळवून दणदणीत विजय (एकूण मते: ७८००+).
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पायाभूत प्रकल्पांच्या नियोजनासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर सदस्यपदी निवड.
सोलापूर महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदी निवड होऊन सामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि विकास कामांमधील पारदर्शकतेसाठी प्रभावी व आक्रमक नेतृत्व केले.
शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुखपदी निवड होऊन संपूर्ण जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांना पाठबळ आणि लोककल्याणकारी योजनांचा झंझावात निर्माण केला.
पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना पक्षाकडून निवड होऊन जिल्ह्याच्या विकासकामांना गती दिली व निधीचा योग्य विनियोग सुनिश्चित केला.
शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय सदस्यपदी निवड.
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ७ मधून तब्बल ४१०३ मताधिक्याने प्रचंड व ऐतिहासिक विजय संपादन करत नगरसेवकपदी विराजमान (एकूण मते: १२,३०६). जनतेचा अतूट विश्वास आणि आशीर्वाद!
हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वचनबद्ध - 'जन सेवा हीच ईश्वर सेवा!'
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'रयतेचे राज्य' या विचारसरणीतून आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या अद्वितीय बलिदानातून प्रेरित होऊन, जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून आम्ही कार्यरत आहोत. प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी निस्वार्थपणे धावून जाणे, सर्वांना न्याय, स्वाभिमान आणि सुरक्षितता मिळवून देणे ही आमची जीवननिष्ठा आहे.
महाराष्ट्र आणि मराठी जनतेचा स्वाभिमान, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अखंड कटिबद्धता.
समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणणे व गरजूंना कोणत्याही अपेक्षेशिवाय थेट मदत करणे.
कष्टकरी विडी कामगार, यंत्रमाग कामगार आणि शेतकरी बांधवांच्या हक्कांसाठी कोणत्याही अन्यायाविरुद्ध ठाम लढा.
महापालिका असो वा पतसंस्था, प्रत्येक ठिकाणी १००% पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख कारभार.
प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास - उत्तम रस्ते, २४ तास शुद्ध पाणी, प्रकाश आणि सुरक्षित परिसर.
सोलापूरच्या बहुरंगी संस्कृतीत सर्व घटकांमध्ये बंधुभाव, सामाजिक शांतता आणि उत्सव सलोख्याने साजरे करणे.
प्रभाग क्र. ७ मधील समस्या, विकासकामांसाठी सूचना किंवा मदतीसाठी आमच्या उत्तर कसबा जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.